बटाट्याच्या काचऱ्या - Batatyachya kachrya
Maharashtrian Potato stirfry
बटाट्याची परतून भाजी - पटकन होणारी
बटाटयाच्या काचर्या ही अगदी सोपी पाककृती आहे. वेळ कमी असताना पटकन करून पोळीबरोबर डब्यात न्यायला येते.
गडबडीत असताना पटकन करायला सोपी अशी ही भाजी आहे. पोळी, पुरी किंवा डोशाबरोबर छान लागते ही.
बटाट्याच्या काचऱ्या कशा करायच्या - पाककृती
बटाट्याच्या काचऱ्यासाठी साहित्य
भाजीसाठी : साहित्य
- बटाटे - २ - ३
- लाल तिखट - १/२ छोटा चमचा
- मीठ - १/२ छोटा चमचा
- साखर किवा गुळ - १/४ चमचा
फोडणीसाठी: साहित्य
- तेल - १ मोठा चमचा
- मोहरी - १/४ चमचा
- जिरे १/४ चमचा
- हिंग - १/४ चमचा
- हळद - १/४ चमचा
- कढीपत्ता - ५-६ पाने
बटाट्याच्या काचर्र्या करण्याची कृती:
बटाटे (तुमच्या आवडीप्रमाणे साले काढून किंवा न काढता) पातळ चिरून घ्या.
मी साले काढलीयेत.
- जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी व जिरे घाला.
- दोन्ही तडतडल्यावर हिंग व कढीपत्ता घालून १० सेकंद परता.
- चिरलेले बटाटे घालून फोडणीत नीट मिसळा. हळद घाला.
- झाकण ठेऊन २-३ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
- झाकण काढून मीठ, तिखट साखर घालून सर्व नीट मिसळा व परत झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवा.
- चमच्याने टोचून बटाटे शिजले आहेत की नाही ते पहा. शिजले नसल्यास एकदा चमच्याने नीट मिसळून आणखी 1-2 मिनिटे शिजू द्या. बटाटे तुम्हाला हवे तितके शिजल्यावर स्टोव्ह बंद करा.
- गरम किंवा गार सर्व करा.
पोळी/चपाती बरोबर किंवा पुरी, दोसे याबरोबर बटाटा काचर्या मस्त लागतात.
You might like these
Find here potato eggplant aloo baingan subji that is easy to make vegetable side dish.
Find here potato cauliflower aloo gobi subji that is easy to make vegetable side dish.
Find here green bean subji recipe. Known as beanschi bhaji in Marathi, beans palya in Kannada.
Click on the Quick links below to go to the section.
New! Comments
Have your say about what you just read! Leave me a comment in the box below.